मानाऊस
मानाऊस : ब्राझीलमधील ॲमेझॉनस राज्याची राजधानी व नदीबंदर. लोकसंख्या ६,१३,०६८ (१९८०). निग्रो व ॲमेझॉन या नद्यांच्या संगमापासून सु.११ किमी. अंतरावर उष्ण कटिबंधीय अरण्य प्रदेशात निग्रो नदीकाठी हे वसलेले आहे. हे राज्यातील व्यापाराचे प्रमुख केंद्र असून येथे सर्व प्रकारच्या दळणवळण-सुविधा उपलब्ध आहेत.